माय नगर वेब टीम
अहमदनगर - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरात हा निषेध केला. सत्तारांचा पुतळा जाळून त्याला जोडीमारो आंदोलन करत जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवी दिल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे.
या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये तर सत्तारांचे कार्यालय फोडण्याचा प्रकार समोर आला आहे.
Post a Comment