जेऊर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार

 माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथे आज शनिवार दिन. 24 रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रघुनाथ झिने यांनी दिली.

     शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते मुस्लिम मोहल्ला कब्रस्तान विकास व सुशोभीकरण तसेच मुस्लिम मोहल्ला रस्ता कॉंक्रिटीकरण या कामांचे उद्घाटन होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 195 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केल्याबद्दल आमदार प्राजक्त तनपुरे यांचा जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

     यावेळी रोहिदास कर्डिले, राजेंद्र भगत, सिताराम काकडे, मंगलताई आव्हाड, भास्कर मगर यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post