वनमहोत्सवा निमित्त जेऊर प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका-नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जेऊर प्राथमिक शाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या पुढाकारातून बुधवार दि.६ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

     उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनेष जाधव, श्रीराम जगताप, मुख्याध्यापक बाबागोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वनरक्षक मनेष जाधव यांनी वृक्षांचे महत्त्व सांगितले. विविध जातींचे वृक्ष व त्याचे फायदे तसेच पर्जन्यमान वाढवण्यासाठी वृक्षांच्या असलेली गरज याबाबत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

     वनरक्षक श्रीराम जगताप यांनी आपल्याला कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किंमत समजली. त्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. वृक्षारोपणाबरोबर त्याचे जतन, संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जंगलाचे प्रमाण कमी असून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम गावोगावी मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले.

     याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनुजा आरे, वनविभागाचे राजेंद्र वाघमारे, संजय सरोदे, उपसरपंच श्रीतेश पवार, माजी उपसरपंच बंडू पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल ससे, सलमान सय्यद यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

-------------------------------------

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post