जेऊरमध्ये कृषीदुतांचे स्वागत

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर मध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय येथील कृषीदूतांचे ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले व गावातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

    डॉ. विखे पाटील कृषी महाविदयालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलग्न कृषी महाविदयालय विळद घाट येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक डॉ. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत देशमुख समाधान, गलांडे रोहीत, कौठाळे ऋषिकेश, दुशिंग आकाश आगे सुभाष हे जेऊर येथील शेतक-यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी सरपंच  राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post