माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील पांगरमल सेवा संस्थेत सत्ता परिवर्तन झाले असून महाविकास आघाडी येथे बाजी मारत सत्ता मिळवली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज आव्हाड व माजी सभापती भरत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनल ने अकरा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. येथील एक जागा बिनविरोध झाली होती.
यापूर्वी पांगरमल सेवा संस्थेमध्ये भाजप गटाची सत्ता होती. परंतु ज्ञानेश्वर आव्हाड व भरत आव्हाड यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास दाखवत महा विकास आघाडीकडे एक हाती सत्ता देऊन सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. पंचायत समिती सदस्य महादेव आव्हाड, बाळासाहेब आव्हाड, संदिप आव्हाड, गणेश आव्हाड व इतर मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. विजयानंतर येथे मोठा जल्लोष करण्यात आला होता.
नूतन संचालकांचे नामदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करुन अभिनंदन केले आहे.
_________________________
पांगरमल सेवा संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. संस्था तसेच सभासदांच्या हितांचे निर्णय घेण्यात येतील. संस्थेमध्ये संपूर्णता पारदर्शी कारभार करण्यात येणार आहे.
..... ज्ञानेश्वर आव्हाड
___________________________