खोसपुरी माजी सरपंच सोमनाथ हारेर यांच्या बंधूचा हद्दपारीचा आदेश रद्द


 माय अहमदनगर वेब टीम 

नगर तालुका -नगर तालुक्यातील खोसपुरी येथील माजी सरपंच सोमनाथ हारेर यांचे बंधू बंडोपंत रंगनाथ हारेर यांना दोन वर्षासाठी नगर जिल्हा हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला होता. विभागीय आयुक्त नाशिक यांनी तो आदेश रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, बंडोपंत हारेर यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये पाच गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा निकाली असून चार बाकी आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्याच्यावर सुनावणी होऊन बंडोपंत  रंगनाथ हारेर यांना २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन वर्षाकरीता नगर जिल्हा हद्दपारीचा आदेश पारित करण्यात आला होता.

     त्याविरोधात नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करण्यात आले होते. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये बंडोपंत हारेर यांच्या बाजूने ॲड. अतिष अरुणराव निंबाळकर यांनी बाजु मांडुन युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य धरत ७ जून २०२२ रोजी उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.

     बंडोपंत हारेर यांचा जिल्हा बंदीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. बंडोपंत हारेर यांना हद्दपारीचे आदेश पारित झाल्यानंतर खोसपुरी परिसरामध्ये खळबळ उडाली होती. तो आदेश रद्द झाल्याने खोसपुरी परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

_________________________________________

आम्ही परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना विविध आंदोलने केली आहेत. त्यामुळे आमच्यावर राजकीय वैमनस्य तसेच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तडीपारीचा आदेश रद्द करण्यात आल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे.

...... सोमनाथ हारेर (माजी सरपंच, खोसपुरी)

_________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post