जेऊर परिसरातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा गणेश आवारे युवा प्रतिष्ठानची मागणी

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवार दि. ११ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी गणेश आवारे युवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. सिना व खारोळी नदीला महापूर आल्याने व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जेऊर परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने ते कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.

       श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात विद्यार्थ्यांना जाण्यासाठी असणारा पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. मगर वस्ती, ससे वस्ती, नाईक मळा येथील पुल तर शेटे वस्ती, बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी या परिसरात अनेक रस्ते व शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

      तरी प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्याची मागणी गणेश आवारे यांनी केली आहे. अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवारे यांनी सांगितले. 

________________________________________________

प्रशासनाकडून पंचनाम्याचा 'फार्स'

प्रशासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स करण्यात येतो. मागील वर्षी पुरपरिस्थितीत जेऊर परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. परंतु एकाही नुकसान ग्रस्त शेतकरी अथवा व्यावसायिक यांना प्रत्येक्षात मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता केवळ दिखाव्यापुरते पंचनामे न करता नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. अन्यथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल.

....... गणेश आवारे (संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे युवा प्रतिष्ठान)

_______________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post