दिंडीतील वारकऱ्यांची सेवा हे पुण्याचे काम- संतोष काळे

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका-- दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करणे हे पुण्याचे काम असल्याचे मत जेऊर येथील जयभवानी उद्योग समूहाचे संचालक संतोष काळे यांनी व्यक्त केले आहे.

      श्री क्षेत्र निळकंठेश्वर महादेव मंदिर दोणगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचे जय भवानी उद्योग समूहाच्या वतीने जेऊर येथे स्वागत करण्यात आले. दिंडी चालक ह.भ.प. पांडुरंग महाराज दोणगावकर यांचा सत्कार गोरख काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी बोलताना संतोष काळे यांनी सांगितले की, दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करणे हे खरोखर पुण्याचे काम आहे. वारकरी हे विठ्ठलाच्या भेटीसाठी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पंढरपूरला जात असतात. त्यांच्या मनात फक्त विठ्ठल भेटीची आस असते. अशा वारकऱ्यांची सेवा करणे हे पुण्याचेच काम आहे. दिंडीतील वारकऱ्यांनी रस्त्याने जाताना शिस्तीत व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन संतोष काळे यांनी केले आहे.

      याप्रसंगी दिंडीतील वारकऱ्यांना जय भवानी उद्योग समूहाच्या वतीने चहा-नाश्ता देण्यात आला. यावेळी ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, अमोल काळे, चंद्रकांत शिंदे, अजय डोळसे, मच्छिंद्र मगर, भानुदास मगर, डॉ. भोरे उपस्थित होते.

_________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post