हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी गौतम आढाव

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका--अहमदनगर हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनची सन २०२२ ते २०२३ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी गौतम आढाव यांची निवड करण्यात आली आहे.

     हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

विभाग प्रमुख इरफान शेख, उपप्रमुख किशोर पोखरणा, उपाध्यक्ष संजय आल्हाट,  सेक्रेटरी रामदास शेवाळे, उपसेक्रेटरी संदीप साळवे, खजिनदार सुनील भिसे, उपखजिनदार सुनील उमाप,

 सदस्य दत्तात्रय वारकड, विकी पगारे, हरीश आल्हाट, विशाल तोरणे, श्रीमंत भालेराव, गौतम जायभाय, राहुल घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.

    हेल्थ केअर मार्केटिग असोसिएशन अहमदनगर च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना गौतम आढाव यांनी असोसिएशनच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. तसेच सर्व सदस्य सहकारी यांना विश्वासात घेऊन असोसिएशनचे कामकाज करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post