संत शिरोमणी सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच संत शिरोमणी संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

       मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंदसरस्वतीजी महाराज (गणेशानंद गड), श्री १०८ महंत सुनील गिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम), श्री शंकरानंद महाराज (ढोलेश्वर संस्थान), महंत भोलागिरी महाराज (हनुमान घाट), पौराहित्य सतिष खोचे गुरुजी (गंगापूर) यांच्या हस्ते संपन्न झाला.

    यावेळी ह.भ.प. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंदसरस्वतीजी महाराज यांचे कीर्तन तसेच ह.भ.प. धनंजय महाराज ससे (जेऊर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते..

      याप्रसंगी ह.भ.प. प्रकाशशास्त्री महाराज ढेपे, ह.भ.प. रघुनाथ महाराज तोडमल, ह.भ.प. रमेश महाराज चौधरी, ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज केंद्रे, ह.भ.प. कन्हैयालाल शास्त्री, ह.भ.प.बाबामहाराज जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आव्हाड उपस्थित होते.

       जेऊर येथे नाभिक समाजाच्या वतीने लोकवर्गणीतून संत सेना महाराजांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे येथील सकल नाभिक समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जेऊर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post