महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवु नका- सरपंच सौ. लामखडे

 माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका


- नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

     याप्रसंगी बोलताना सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी सांगितले की, महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवू नका. त्यांचे कार्य खूप महान आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज आहे. महापुरुषांच्या जयंती साज-या होत आहेत. परंतु त्यांचे विचार आचरणात येणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय असे राहिलेले आहे.

      सौ. लामखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. गावामध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी काळजी घ्यावी. ग्रामीण भागात आजही चांगली संस्कृती आहे. सर्वजण सण तसेच एकमेकांच्या सुखदुःखात मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात. ही संस्कृती टिकण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेविरुद्ध लढा दिला. समता प्रस्थापित करण्यासाठी मोठे कार्य केले. गावामध्ये एक कृती समिती स्थापन करून जातीय सलोखा अबाधित राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही प्रियंका लामखडे यांनी सांगितले. तसेच यापुढे गावामध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा पायंडा निंबळक गावांमध्ये सुरू करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न करण्यात असल्याची माहिती लामखडे यांनी दिली.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. प्रियंका लामखडे, ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांच्या हस्ते उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिंदे, आबा म्हस्के,व्हाइस चेअरमन अविनाश आळंदिकर, बाबा पगारे, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले

_______________________________

गावामध्ये जातीय सलोखा ही अभिमानाची बाब

निंबळक गावामध्ये अठरापगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांच्या सण, उत्सव तसेच सुखदुःखात सामील होऊन एक विचाराने राहत आहेत. निंबळक गावामध्ये जाती-जातीत तेढ निर्माण होत नाही. सर्वधर्मसमभाव ही प्रथा निंबळक गावांमध्ये दिसून येते ही अभिमानाची बाब आहे.

.....अजय लामखडे (युवा नेते)

_____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post