खडकी सेवा सोसायटीमध्ये जगदंबा शेतकरी पॅनलचे एकतर्फी वर्चस्वमाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - खडकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये  जगदंबा शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13 जागा मोठ्या मताधिक्याने  विजयी झाले.  खडकीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सेवा सोसायटी चे  चेअरमन यांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.


खडकी ता.नगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत जगदंबा शेतकरी विकास पॅनल चे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती जमातीमधून गोविंद पवार यांची जागा पूर्वीच अविरोध झाली होती. त्यांनंतर उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक न करता 6-6 जागा समान वाटप करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न जगदंबा शेतकरी विकास पॅनल कडून करण्यात आला, पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले.

सोमवार 18 मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली त्यामध्ये सर्व 12 जागा जगदंबा शेतकरी विकास पॅनलने मोठ्या फरकाने जिंकल्या . कर्जदार मतदार संघात केतन प्रकाश निकम , शरद बापूराव कोठुळे, ज्ञानदेव पाटीलबा भोसले, संजय हरिभाऊ बहिरट, शिवाजी गणपत कोठुळे, अशोक भिमाजी कोठुळे, अशोक ठकाराम रोकडे, अशोक काशीनाथ कोठुळे, मोठया मताधिक्याने विजयी झाले.कर्जदार मतदार संघात केतन प्रकाश निकम यांना सर्वाधिक मते मिळाली. महिला राखीव मतदार संघात मीरा अजित कोठुळे, अश्विनी भाऊसाहेब रोकडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. अनुसूचित जाती जमाती मतदार संघात निकेतन राजू तडके यांनी विद्यमान उपसरपंच सुरेखा गायकवाड यांच्या 68 मतांनी पराभव केला, तर इतर मागास प्रवर्ग मतदार संघात तालुका दूध संघाच्या संचालिका पुष्पा शरद कोठुळे यांनी विद्यमान सरपंच प्रवीण कोठुळे यांचा 30 मतांनी पराभव केला. विद्यमान चेअरमन राहुल सुनिल कोठुळे यांचाही यात पराभव होऊन ते 11 व्या क्रमांकावर राहिले.

जगदंबा शेतकरी विकास पॅनल चे नेतृत्व पत्रकार जितेंद्र निकम, शरद कोठुळे, ज्ञानदेव भोसले,प्रा. सुनिल कोठुळे, रावसाहेब कोठूळे, महेश कोठुळे  यांनी केले. निवडणूक अधिकारी म्हणून पी.एन.सुर्वे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून रावसाहेब काळे यांनी काम पाहिले. सर्व विजयी उमेदवारांचा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post