हिंदी अध्यापक सेवा संघाचा उपक्रम : जिल्हयातील हिंदी शिक्षकांसाठी शनिवारी कार्य शाळा

 

माय अहमदनगर वेब टीम

जिल्हयातील १८ शिक्षकांना गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार जाहिर


नगर तालुका-  हिंदी भाषेत नाविन्यपुर्ण कार्य करून राष्ट्रभाषेचा सन्मान वाढविण्यात योगदान देण्याऱ्या नगर जिल्ह्यातील १८ हिंदी अध्यापकांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . अशी माहिती हिंदी अध्यापक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुरूषोत्तम पगारे यांनी दिली .

पुरस्कार वितरण समारंभ नगर शहरातील शनिवार दि. २३ रोजी सकाळी साडे दहा वाजता माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात  येथे आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व ग्रंथ देण्यात येणार आहे.

 पगारे म्हणाले की दक्षिण नगर भागातील हिंदी शिक्षक यांच्यासाठी कार्य शाळा व पुरस्कार वितरण समारंभ

  आयोजित करण्यात आला आहे.यासाठी बालभारतीच्या हिंदी भाषाधिकारी अलका पोतदार , शिक्षणाधिकारी अशोक कडूस , माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे ,काकासाहेब वाळूंजकर

माजी प्राचार्य, रयत शिक्षण संस्था, सातारा कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे 

अध्यक्ष, नगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ असणार आहेत . यात  राष्ट्रभाषा हिंदी : आव्हाने यावर अलका पोतदार यांचे व्याख्यान होणार आहे .  

 यावेळी हिंदी अध्यापकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन सुरेश गोरे 

सचिव, अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ,

रमजान सय्यद 

संयोजक, कार्यशाळा व पुरस्कार वितरण समिती ,बाळासाहेब नवले खजिनदार, अ. नगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ

एकनाथ जाधव सर

सहसचिव, नगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ

राजाराम टपले 

सहसंयोजक, कार्यशाळा व पुरस्कार वितरण समिती यांनी केले आहे .

_____________________

यांना मिळणार पुरस्कार


डॉ .निशात शेख , शमशुद्दीन इनामदार , बेबीनंदा लांडे , हबीब शेख , बबन लांडगे , बाळासाहेब घुले , जुबेर सय्यद , भगवान मते , समिना सय्यद , सतीश पंडित , शिवनाथ वेताळ , शारदा बचाटे, सुरेश विधाते , योगेश गुंड , महेंद्र थीटे, दादा गदादे , रविंद्र चोभे ,फयाज शेख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post