तरुणाचा समाजापुढे आदर्श; विधवा भावजईसोबत केले हात पिवळे



माय अहमदनगर वेब टीम 

राहाता  - राहाता तालुक्यातील राजुरी येथे गोपाळ समाजातील एका तरुणाने विधवा भावजाईसोबत हात पिवळे करुन त्याने गोपाळ समाजात एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. या विवाहाची तालुक्यात एकच चर्चा सुरु आहे.

नवनाथ पवार यांच्या थोरल्या बंधूंचे नुकतेच तीन महिन्यापूर्वी निधन झाले होते. यानंतर त्यांच्याच घरातील व्यक्ती ताराचंद पवार यांचे भाऊ सुखदेव पवार व भावजाई लता पवार यांनी या विधवा झालेल्या मुलीला माहेरी न जाऊ देता सासरीच ठेवले. दोघांनीही आपापसात चर्चा करुन घरातील लहान भावाशी या मुलीचा पुनर्विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. इतर पाहुण्यांबरोबरही चर्चा केली. अशा प्रकारचा हा विवाह समाजापुढे एक आदर्श निर्माण होऊ शकतो असे पटवून दिले. त्यानंतर इतर सगळ्या नातेवाईकांच्या भावनेतून होकार आला. त्यानंतर तातडीने हा विवाह पक्का करुन सोहळा साध्या पद्धतीने राजुरी येथील श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या समोर असणार्‍या जागेत गुरूंच्या उपस्थितीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न केला.


हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सुखदेव पवार व त्याची पत्नी लता पवार यांच्यासह संजय पवार, प्रताप पवार, गणेश जाधव, प्रदीप जाधव, शंकर गिरे, मच्छिंद्र पवार, सुनिल पवार, भारत पवार, मेजर रमेश पवार, अशोक पवार, विकास गव्हाणे, मेजर अनिल जाधव, सचिन गव्हाणे, ज्ञानदेव दिवे, राजेंद्र खंडागळे यांच्यासह इतर नातेवाईक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. हा झालेला विवाह सोहळा समाजापुढे एक आदर्श निर्माण करेल अशी अपेक्षा सुखदेव पवार व युवकांनी व्यक्त केला. या झालेल्या आगळ्यावेगळ्या एक आदर्श विवाहाची सध्या चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.

समाजामध्ये आज आपण अनेक लग्न समारंभ मोठ्या धूमधडाका होताना पाहत आहोत. तर अनेक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात होणार्‍या विवाह समारंभानंतर अनेक तक्रारी पाहावयास मिळत आहे; परंतु राजुरी येथे झालेला मोजक्या नागरिकांमध्ये झालेला हा अनोखा विवाह समारंभ राहाता तालुक्याला एक आदर्श मानणारा ठरत आहे. अशा पद्धतीने समाजामध्ये या पुनर्विवाहाचा आदर्श आजच्या तरुण पिढीतील मुलामुलींनी घेण्यासारखे असून या छोट्याशा झालेल्या विवाह समारंभास चिवडा व एक लाडू उपस्थित असणार्‍या नागरिकांना वाटून विवाह समारंभ संपन्न झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post