बायकोच्या हातचा अप्रतिम शीरा खाऊन कामावर परतला विकी कौशल, स्वत: सेल्फी शेअर करून दिली माहिती

 अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर आता विकी कौशल कामावर परतला आहे. विकीने स्वतःचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत स्वतः ही माहिती दिली आहे. या फोटोमध्ये विकी कौशल कारमध्ये जाताना दिसत आहे. पोस्टमध्ये त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी जात असल्याची हिंट देखील दिली आहे.


विकी कौशलने त्याचा सेल्फी शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "सर्वप्रथम कॉफी आणि नंतर क्लिपबोर्ड." या कॅप्शनवरून तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विकी अनेकदा कारपासून शूटिंग लोकेशनपर्यंतचे सेल्फी आणि व्हिडिओ शेअर करत असतो. चित्रपटाच्या सेटवर जाताना तो बहुतेक पंजाबी गाणी ऐकताना दिसतो.विकी केले होते कतरिनाने बनवलेल्या गोड पदार्थाचे कौतुक

एक दिवस आधी विकी कौशलची पत्नी कतरिना कैफने लग्नानंतर पहिल्यांदा घरी शीरा बनवला होता. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत विकीच्या हातात शीरा आहे. हा फोटो शेअर करत “आता पर्यंतचा सगळ्या अप्रतिम शीरा” असे कॅप्शन त्याने दिले होते. तर असाच एक फोटो कतरिनाने देखील शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘मी बनवला’ असे कतरिना म्हणाली होती. यासोबतच विकी कौशलच्या घरात ही विधी कोणत्या नावाने केली जाते याचाही उल्लेख करण्यात आला. तिने सांगितले की, विकीच्या घरात या विधीला ‘चौका चारधाना’ म्हणतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post