आगामी 'कॅम्पस डायरिज' या वेब सीरिजमध्ये अभिनेता मनोज जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच प्रेम मिस्त्री व अभिषेक यादव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. कॉलेजमध्ये घालवलेली वर्षे आपल्या नकळतच आपले आयुष्य सर्वाधिक प्रमाणात घडवत असतात आणि या काळातील आठवणी आयुष्यभर आपण मनामध्ये जपून ठेवतो. फ्रेशर्स पार्टीपासून ते रिलेशनशीपमधल्या ड्रामापर्यंत, प्रोफसर्सची नक्कल करण्यापासून ते क्लास बंक करण्यापर्यंत, कॉलेजमधल्या पॉलिटिक्सपासून ते कॅन्टीनमधल्या झगड्यांपर्यंत कित्येक आठवणींचा कॉलेजचा काळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्मृतीत वेगवेगळ्या प्रकारे रेंगाळत राहतो.
मागची दोन वर्षे मात्र कल्पनेहूनही विचित्र होती, त्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी गृहित धरलेला कॉलेजचा हा काळ अनेकांना अनुभवताच आला नाही. नवीन अनुभव घेण्याचा उत्साह, एक नवे शैक्षणिक वर्ष, नवे चेहरे, नव्याने जुळणारे मैत्र, कॉलेजचे ते पहिलं सोशल – सगळे काही कॉम्प्युटर स्क्रीनच्या छोट्याशा चौकटीत जणू बंदिस्त झाले. अखेर आयुष्य पुन्हा पुर्वीसारखे सुरळीत होऊ लागले असताना, कॉलेजची दारेही पुन्हा एकदा खुली होत आहेत आणि विद्यार्थीही कॅम्पस् लाइफ अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहत असताना एमएक्स प्लेअर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे एक्सेल युनिव्हर्सिटीमधील पाच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मोठं होण्याचा काळ चितारणारा एक कमिंग-ऑफ-एज ड्रामा – कॅम्पस डायरीज! मात्र हा ड्रामा तुमच्या नेहमीच्या कॉलेज कथांसारखा बिलकुल नाही कारण त्यात तरुणाईच्या कहाण्यांमध्ये हटकून आढळणा-या नेहमीच्या मस्ती आणि दोस्तीच्या कथानकांपलीकडचेही खूप काही आहे.
Post a Comment