ओमायकॉन आणि डेल्टा मिळून बनवू शकतात धोकादायक व्हेरिएंट, ब्रिटिश तज्ज्ञांनी दिला इशारा

 


ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जग हैराण झाले आहे. दरम्यान, सुपर व्हेरिएंटचा धोकाही समोर येत आहे. यूकेच्या आरोग्य एक्सपर्टने एक भयावह इशारा जारी केला आहे. मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी म्हटले आहे की, जर ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने एकत्र मिळून एखाद्याला संक्रमित केले, तर कोरोनाचा नवा सुपर व्हेरिएंट तयार होऊ शकतो. यूकेमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन उद्रेकाच्या वेगामुळे सुपर-व्हेरिएंटची भीती निर्माण झाली आहे.


आपापसात डीएनए बदलू शकतात व्हायरस 

डॉ. बर्टन म्हणाले की, सामान्यत: लोकांना कोरोनाच्या फक्त एका म्यूटेंट स्ट्रेनचा संसर्ग होतो. काही विशेष प्रकरणांमध्ये एकाच वेळी दोन स्ट्रेन रुग्णाला संक्रमित करतात. जर डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही एकालाच संक्रमित करतात, तर ते एकमेकांशी डीएनएची देवाणघेवाण करू शकतात. जर हे दोघे एकत्र आले तर कोरोनाचा नवा सुपर स्ट्रेन तयार होऊ शकतो.


डॉ. बर्टन यांनी सांगितले की जर दोन्ही व्हेरिएंट एकत्र केले तर आणखी धोकादायक प्रकार तयार होऊ शकतो.



यापूर्वीही समोर आली आहेत स्ट्रेनची प्रकरणे 

न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ पीटर व्हाईट यांनी देखील या महिन्यात एक सुपर स्ट्रेन उद्भवण्याचा इशारा दिला. जानेवारीमध्ये, ब्रिटिश आरोग्य तज्ज्ञांनी स्पेनमध्ये काही प्रकरणे नोंदवली, ज्यामध्ये अल्फा स्ट्रेन आणि B.1.177 स्ट्रेन एकामध्ये विलीन झाले. त्याचवेळी, कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी देखील फेब्रुवारीमध्ये सांगितले. त्यांनी एक स्ट्रेन ओळखला ज्यामध्ये केंट स्ट्रेन आणि B.1.429 विलीन झाले होते.


ब्रिटनमध्ये 11,708 ओमायक्रॉनबाधित

ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचे रेकॉर्डब्रेक प्रकरणे नोंदवली जात आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात 93 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ओमायक्रॉनच्या 11,708 प्रकरणांची येथे पुष्टी झाली आहे. प्रत्येक पाच नवीन प्रकरणांपैकी एक ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आहे.


91 देशांमध्ये पसरला नवा व्हेरिएंट 

आतापर्यंत 91 देशांमध्ये ओमायक्रॉन प्रकाराची पुष्टी झाली आहे. डेन्मार्कमध्ये 9,009, नॉर्वेमध्ये 1,792 आणि दक्षिण आफ्रिकेत 1,247 प्रकरणे आढळली आहेत. भारतातही या व्हेरिएंटने 100 चा टप्पा ओलांडला आहे. नीती आयोगाने एक चेतावणी दिली आहे की जर ब्रिटनप्रमाणे भारतात संसर्ग पसरला तर दररोज 1.4 दशलक्ष प्रकरणे नोंदवली जातील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post