चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही, तुम्हाला ते पटलं असेल तर…- संजय राऊत



 मुंबई | राज्यात मागील दोन दिवस ज्याप्रकारे राजकीय नाट्य थरार झाला आहे त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नारायण राणेंना जामीन मिळाल्यावर त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर पुन्हा टीका केली. त्यांच्या कालच्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचा भुवनेश्वरचा दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईमध्ये परतले आहेत. राऊत यांनी विमानतळावरच पत्रकारांसोबत संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे. काय करायचं काय नाही करायचं हे ठरवणारे नारायण राणे कोण आहेत? मोदी आणि आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते, असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

नारायण राणे म्हणजे केंद्र सरकार नाही. जर आम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी, अमित शहांशी, राष्ट्रपतींशी बोलू. कोणी काहीही वक्तव्य केलं तर प्रतिक्रीया द्यायलाच हवी असं नाही. आम्हाला कामं असतात, असा चिमटा त्यांनी नारायण राणेंना काढला. भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. याविषयी बोलताना राऊत म्हणाले कोण काय म्हणलं मला माहित नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या वक्तव्यास पाच वर्षे लोटली आहेत. तेव्हा आश्चर्य वाटलं नाही. इतके दिवस झोपले होते का?, असा प्रश्न त्यांनी भाजपला केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी योगींवर वक्तव्य का केलं तर शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून आम्ही बोललो. चपला घालून कोणी हार घालत नाही. भाजपला हे आवडलं असेल तर ठिक आहे. चपला घालून हार न घालणे ही आमची परंपरा आहे. आम्हाला महाराजांबद्दल आदर आहे. भाजपला जर हे योग्य वाटत असेल तर त्यांनी जाहीर करावं, असं म्हणत त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post