देशात दिवसभरात ओमायक्रॉनच्या 18 नव्या रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात 8, कर्नाटकात 6 आणि केरळमध्ये 4 रुग्ण आढळले

 


देशातील 3 राज्यांमध्ये आज ओमायक्रॉनचे एकूण 18 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 8, कर्नाटकातील 6 आणि केरळमधील 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. देशात सध्या ओमायक्रॉनबाधितांची सर्वाधिक संख्या (48) महाराष्ट्रात आहे. मुंबईत 4, साताऱ्यात 3 आणि नागपुरात 1 रुग्ण आढळून आला आहे.


त्याचवेळी, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील दोन वैद्यकीय संस्थांमध्ये कर्नाटकात सापडलेले 6 बाधित आढळले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 131 झाली आहे.


मुंबईत पुन्हा निर्बंध!

मुंबईतील ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. बीएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोकांना गर्दी जमवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हॉलमध्ये विवाहसोहळा आयोजित करण्यासाठी, लोक फक्त 50% क्षमतेपर्यंत जमू शकतील. मोकळ्या जागांवर, क्षमतेच्या केवळ 25% लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.


1000 पेक्षा जास्त लोकांच्या मेळाव्याला आधी परवानगी घ्यावी लागेल. महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे. या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक मेळाव्याला, रॅलीला किंवा निदर्शनास परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक जमू शकणार नाहीत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन एकूण रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, देशभरातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 131 झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post