पहिल्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीप स्पर्धेचा महाराष्ट्र ठरला मानकरी

 


संगमनेर |

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या पहिल्याच राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी सुवर्ण कामगिरी बजावतांना 69 पदकांसह चॅम्पियनशीपचा किताबही पटकाविला आहे. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण करताना एकूण पदकांमध्ये 44 सुवर्णपदके पटकाविली. तामिळनाडूच्या संघाने दुसरे तर पश्चिम बंगालसह हरियाणाच्या संघाने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळविले.


या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघाने खेलो इंडिया स्पर्धेसाठीचा आपला मार्गही प्रशस्त केला. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन व ओडिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.


स्पर्धेतील पारंपरिक योगासनांच्या प्रकारात सब-ज्युनिअर मुलींच्या गटात तृप्ती रमेश डोंगरेने सुवर्ण, सब-ज्युनिअर मुलांच्या गटात स्वराज सनी फिसके याने सुवर्ण तर आर्यन बिभीषण खरात याने रौप्यपदक मिळविले. मुलींच्या ज्युनिअर गटात स्वरा संदीप गुजर हिने तर मुलांच्या गटात सुमित दिलीप बंडाळे याने सुवर्ण, जय संदीप कालेकर याने रौप्य तर प्रीत निलेश बोरकरने कांस्य पदकांची कमाई केली. योगासनांच्या कलात्मक प्रकाराचे सादरीकरण करतांना महाराष्ट्र संघाच्या सब-ज्युनिअर मुलींच्या गटात तृप्ती रमेश डोंगरेने सुवर्ण, प्रांजल सोमनाथ वन्ना हिने रौप्य, तर मुलांच्या गटात निबोध अविनाश पाटीलने सुवर्ण व आर्यन बिभीषण खरातने कांस्यपदके मिळविली.


मुलींच्या ज्युनिअर गटात रुद्राक्षी पंकज भावेने सुवर्ण, स्वरा संदीप गुजरने रौप्य, मृणाली मोहन बानाईतने कांस्य तर मुलांच्या गटात जय संदीप कालेकरने सुवर्ण, ओम महेश राजभरने रौप्य व प्रीत निलेश बोरकरने कांस्य पदके मिळविली. कलात्मक श्रेणीतील दुहेरी प्रकारातही महाराष्ट्र संघाचा बोलबाला राहीला. या प्रकारातील मुलींच्या सब-ज्युनिअर गटात प्रदर्शन करतांना महाराष्ट्राच्या देवांशी नागराज वाकळे व तृप्ती रमेश डोंगरे यांनी सुवर्ण व युगांका किशोर राजम आणि वैदेही रुपेश मयेकर यांनी रौप्य पदकांची कमाई केली. याच प्रकारातील मुलांच्या गटात निबोध अविनाश पाटील व आर्यन बिभीषण खरात यांनी सुवर्ण, नानक नारायण अभंग व अंश रुपेश मयेकर यांनी रौप्य पदकांची कमाई केली.


मुलींच्या ज्युनिअर गटात रुद्राक्षी पंकज भावे व तन्वी भूषण रेडीज् या जोडीने सुवर्ण व गीता सारंग शिंदे व मृणाली मोहन बाणाईत यांच्या जोडीने रौप्यपदक मिळविले. मुलांच्या गटात ओम महेश राजभर व प्रीत निलेश बोरकर यांच्या जोडीने सुवर्ण तर जय संदीप कालेकर व रुपेश मोगलाली सांगे यांच्या जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. सांगितीक प्रकारातील मुलींच्या सब-ज्युनिअर दुहेरी गटात गीता सारंग शिंदे व स्वरा संदीप गुजर या जोडीने सुवर्ण, मुलांच्या गटात निबोध अविनाश पाटील व श्रुमल मोहन बाणाईत या जोडीने सुवर्ण आणि नानक नारायण अभंग व अंश रुपेश मयेकर या जोडीने रौप्यपदक मिळविले. मुलींच्या ज्युनिअर दुहेरी गटातही महाराष्ट्र संघाच्या गीता सारंग शिंदे व स्वरा संदीप गुजर या जोडीने सुवर्ण, मृणाली मोहन बाणाईत व तन्वी भूषण रेडीज् या जोडीने रौप्य व मुलांच्या गटात जय संदीप कालेकर व प्रीत निलेश बोरकर यांच्या जोडीने सुवर्ण तर सुमित दिलीप बंडाळे व रुपेश मोगलाली सांगे या जोडीने रौप्यपदक पटकाविले.


योगासनांच्या सांघीक सादरीकरणातही महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण कामगिरी करतांना कलात्मक श्रेणीतील मुलींच्या सब-ज्युनिअर संघातील तृप्ती डोंगरे, देवांशी वाकळे, युगांका राजम, वैदेही मयेकर व प्रांजल वन्ना यांनी तर मुलांच्या गटात निबोध पाटील, आर्यन खरात, श्रृमल बाणाईत, अंश मयेकर व स्वराज फिसके यांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. याशिवाय मुलींच्या ज्युनिअर गटात मृणाली बाणाईत, सेजल सुनील सुतार, स्वरा गुजर, रुद्राक्षी भावे व तन्वी रेडीज यांनी, तर मुलांच्या गटात जय कालेकर, रुपेश सांगे, प्रीत बोरकर, ओम राजभर व सुमित बंडाळे यांच्या संघाने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व निर्माण करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेत सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या योगासन संघाचा दबदबा होता.


राष्ट्रीय पातळीवरील या पहिल्याच चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने 44 सुवर्ण, 21 रौप्य व चार कांस्य पदकांसह 69 पदकांची कमाई करीत जनरल चॅम्पियनशीपचा राष्ट्रीय किताब पटकावतांना खेलो इंडिया स्पर्धेसाठी आपला मार्गही प्रशस्त केला.


या स्पर्धेत देशभरातील 30 राज्यांचे 560 योगसन खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत तामिळनाडूच्या संघाने दुसरे स्थान मिळविले, तर पश्चिम बंगाल आणि हरियाणाच्या संघाला संयुक्तपणे तिसरे स्थान मिळाले. ओडिशा हॉकी कौंसिलचे अध्यक्ष, पद्मश्री दिलीप तिरके यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आणि संघाला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post