विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरूवात झाली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना काही जात प्रमाणपत्र नसल्यानं प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जमा करावा लागत आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सरकारकडून त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र येईपर्यंत विद्यार्थी वडिलांचं जात प्रमाणपत्र वापरुन प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी काही अडचण येऊ नये म्हणून तात्पुरतं वडिलांचं प्रमाणपत्र वापरू शकता. एकदा विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र आलं की त्यांना ते लगेच काॅलेजमध्ये जमा करावं लागणार आहे. त्यामुळे आता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नसल्याची शक्यता आहे.
Post a Comment