राज्यात सर्वदूर पाऊस?, हवामान खात्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारामुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आजपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस पुर्ववत झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडणार आहे.

मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 20 ऑगस्ट पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पालघर, नंदुरबार, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांना हवामान खात्याने उद्या यलो अलर्ट आहे. अरबी समुद्रामध्ये वाऱ्यांचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा मच्छिमारांना देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात काही आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळं पीकांनाही याचा फटका बसू लागला होता. मात्र कालपासुन पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post