अफगाणिस्तान तालिबान्यांकडे जाताच भारताला मोठा धक्का, ‘या’ गोष्टीवर निर्बंध!


 

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे. या घटनेने संपुर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. तालिबानी आपल्या राजवटीला सुरूवात करत आहे. महिलांवर अन्यायकारी धोरण राबवणं असेल. किंवा कठोर शिक्षा करणे असेल हे नियम आता लागू होत आहेत. एवढंच नाही तर देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार हा आता तालिबानच्या नियमानुसार होणार आहे.

भारत सरकारने तालिबानबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची या संभ्रमात आहे. अद्याप भारत सरकारने आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. पण तालिबानने भारताशी असलेले व्यापारी संबंध आतापासूनच ताणायला सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची वाहतूक होत असते. पण तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचं लक्ष राहिल, असं अजय सहाय यांनी सांगितलं.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात चांगले व्यापारी संबंध आहेत. भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तालिबानची सत्ता आल्याने आता हा व्यापार आणि भारताची गुंतवणूक अडचणीत सापडली आहे पण भारत सरकार अजून याबद्दल बोलताना दिसत नाही.

सुकामेवा हा प्रमुख घटक आपण अफगाणिस्तानातून आयात करतो. 85 टक्के सुकामेवा हा आपला देश अफगाणिस्तानमधून आयात करत असतो पण आता आयात- निर्यात बंदी आल्यामुळे सुकामेव्याचे दर प्रंचड प्रमाणात वाढताना पहायला मिळतील. भारताने आतापर्यंत 400 विविध प्रकल्पात 835 कोटी डाॅलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक आता बुडण्याची भिती निर्णाण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post