‘आमच्या संघात खूप एकी, एकाला डिवचाल तर…’; के. एल. राहुलचा इंग्लंडच्या खेळाडूंना टोला



मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. के. एल. राहुल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज हे या सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात अनेकदा गरमागरमी झालेली पहायला मिळाली. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी अखेरच्या दिवशी स्लेजिंग सुरू केली. त्यावर आता भारताचा सलामवीर के. एल. राहुल याने इंग्लंडच्या खेळाडूंना इशारा दिला आहे.

आमच्या संघात खूप एकी आहे. त्यामुळे जर कोणी आमच्या संघातील एकालाही डिवचलं तर, याचा अर्थ असा होईल की, त्याने भारतीय संघाला डिवचलं. जर आम्हाला कोणी डिवचलं तर आम्हीही त्यांना जशास तसं आणि उत्तर देऊ. त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, असा इशारा के. एल. राहुलने इंग्लंडच्या खेळाडूंना दिला आहे.

इंग्लंड दौऱ्यावरच्या या मालिकेत आम्ही पुर्ण ताकदीनिशी खेळायचं ठरवलंय. त्यामुळे आम्ही आगामी विजयासाठी देखील उत्सुक आहोत, असंही राहुलने सांगितलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात शमी आणि बुमराह फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचण्यास सुरूवात केली. पण शमी आणि बुमराहने संयमी खेळी करत 90 धावांची भागेदारी केली होती.

दरम्यान, वू़ड, अँडरसन आणि राॅबिन्सन या तीन गोलंदाजांनी शमी आणि बुमराहला बाउंसर टाकण्यास सुरूवात केली. त्यावेळी मार्क वूडचा एक चेंडू बुमराहच्या हेलमेटला लागला. त्यानंतर देखील त्यांनी दोघांना डिवचलं होतं. तर त्याआधी राॅबिन्सनने के.एल.राहुलच्या खांद्याला धक्का दिला होता. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंच्या खेळाडू वृत्तीवर सवाल उपस्थित केले जात आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post