पैसे काढणे आणि चेक बुकसाठी अध‍िक शुक्ल दावे लागणार, जाणून घ्या काय आहेत नवीन न‍ियम?

 


माय वेब टीम 

जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी 1 जुलैपासून काही नवीन न‍ियम लागू केले आहेत. या न‍ियमानुसार, एटीएममधून पैसे काढणे आण‍ि चेक बुकचा वापर केल्यावर जास्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यासोबतच बेसिक सेविंग बँक डिपॉजिट (BSBD)खात्यावरदेखील हे न‍ियम लागू असणार आहे. त्यामुळे काय आहे हे नवीन न‍ियम याबद्दल जाणून घेणार आहोत...

एटीएममधून पैसे काढणे होईल महाग
एसबीआय ग्राहकांना आता मह‍िन्यातून केवळ चारच वेळा एटीएम आणि बँक खात्यातून व‍िनामूल्य पैसे काढता येणार आहे. त्यानंतर ग्राहकांच्या प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अध‍िक जीएसटी भरावी लागणार आहे. व‍िशेष म्हणजे हे न‍ियम गृह शाखा, नॉन एसबीआय एटीएम आणि एसबीआय एटीएमवर लागू असेल.

शाखेतून पैसे काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार
जर आपण एसबीआयच्या शाखेतून आपली मर्यादा ओलांडली असेल तर तेथून पुढील प्रत्येक व्यवहारावर शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वरी द‍िलेल्या शुल्क एवढेच आकारले जातील. व‍िशेष म्हणजे इतरांना पैसे पाठविणे पुर्णपणे मोफत असेल.

चेक बुकसाठी जास्त पैसे मोजावे लागतील
एसबीआयच्या ग्राहकांना प्रती वर्ष चेक बुकच्या 10 कॉपी द‍िल्या जातात. त्यासाठी 40 रुपये अध‍िक जीएसटी आकारला जात असून 25 पेजसाठी 75 रुपये अध‍िक जीएसटी आकारला जातो. याव‍ित‍िरिक्त आपत्कालीन चेकसाठी 50 रुपये स्विकारले जात असून यामध्ये 10 कॉपी द‍िल्या जातात. व‍िशेष ज्येष्ठ नागर‍िकांकडून कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

गैर-आर्थिक व्यवहार विनामूल्य असेल
एसबीआय आणि एसबीआय बँक शाखांमधील बीएसबीडी खातेदारांना गैर-आर्थिक व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या खातेदारांसाठी शाखा आणि वैकल्पिक चॅनेलद्वारे व्यवहार देखील विनामूल्य असणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post