...म्हणून शिक्षा टाळण्यासाठी दाखल केली होती याचिका

 


माय वेब टीम 

मुंबई - टी सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आरोपी अब्दुल रौफी यांची याचिका फेटाळून लावत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. आरोपी अब्दुल रौफीने गुलशान कुमार यांची 2017 मध्ये मुंबईतील जूहू परिसरात गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर काही वर्षे तो फरार होता. संबंधित प्रकरणात न्यायालयाने रमेश तोराणी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु, तोराणी यांच्या सुटकेविरोधात पुन्हा कोर्टात अपील करणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.

बनावट पासपोर्ट प्रकरणात रौफला अटक
गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने रौफला 2002 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, तेंव्हापासून रौफ हे औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु, 2009 मध्ये तो पॅरोलवर आपल्या परिवाराला भेटण्यासाठी बाहेर आला आणि पॅरोल संपताच बांग्लादेशला फरार झाला. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2016 मध्ये बांग्लादेश येथे बनावट पासपोर्ट प्रकरणात त्याला अटक करत प्रत्यार्पण करण्यासाठी मुंबईला आणले.

अबु सालेमने 10 कोटी रुपयांसाठी हत्येची दिली सुपारी
तपासानुसार, अबू सालेमने गुलशन कुमार यांच्याकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु, कुमार यांनी मी या पैशाचा वैष्णो देवीमध्ये भंडारा आयोजित करेन असे सांगितले होते. त्यामुळे रागाच्या भरात सालेम यांनी शूटरच्या माध्यमातून गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1197 मध्ये मुंबईतील दक्षिण अंधेरी भागातील जितेश्वर मंदिराजवळ गोळ्या झाडून हत्या केली.

गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या होत्या 16 गोळ्या
गुलशन कुमार हे बॉडीगार्डशिवाय मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. दरम्यान, तीन हल्लेखोरांनी याचा फायदा घेत कुमार यांच्यावर एकामागून एक अशा 16 गोळ्या झाडल्या. ड्रायव्हरने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यावरदेखील हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. गुलशन कुमार यांना दवाखान्यात नेताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

या प्रकरणात गायक नदीमचे नाव आले होते समोर
गुलशन कुमार हत्याकांडमध्ये गायक नदीम यांचे नावदेखील समोर आले होते. गुलशन कुमार यांची हत्या त्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आली असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. कारण गुलशन कुमार यांच्या कंपनी टी-सीरीजने संगीत उद्योगात नदीम-श्रावण यांची जोडीला समोर आणले होते. परंतु, काही कारणास्तव नदीम आणि कुमार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे नदीमला कोणत्याच इंडस्ट्रीजमध्ये काम मिळत नव्हते. परिणामी रागाच्या भरात नदीम यांनी अबू सालेमला कुमार यांची सुपारी दिली. या घटनेनंतर नदीम भारतातून पळून गेला असून सध्याही तो फरार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post