लॉकडाऊनमुळे सोने काळवंडले; विक्रीत झाली 42% घट, 1994 नंतर प्रथमच सर्वात कमी विक्री

माय वेब टीम 

लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकरी गमावली, अनेकांच्या पगारात कपात झाली. सणांवरही निर्बंध आलेे. मर्यादित उपस्थितीत विवाह सोहळ्यांना मात्र परवानगी आहे. यामुळेच गेल्या दीड वर्षात विवाह वगळता अगदी अक्षय्य तृतीयेसारख्या मुहूर्तावरही सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे . सोने विकत घेण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगत हातचा पैसा जपून ठेवण्याकडे नागरिकांचा कल आहे. गेल्या वर्षी २३ मार्चपासून सुरू लागलेल्या लॉकडाऊनचा परिणाम २०२० च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत म्हणले एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान प्रकर्षाने जाणवला. सोन्याची विक्री ४२ टक्क्यापर्यंत घटली. २०१९ मध्ये या काळात ५४४.६ टन सोने विकले गेले. २०२० मध्ये केवळ ३१५.९ टन सोन्याची विक्री झाल्याचे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालावरून दिसून येते. १९९४ नंतरची ही सर्वात कमी विक्री आहे. १९९४ मध्ये नवे सोने धोरण, भारताची आर्थिक परिस्थिती यामुळे सोन्याची मागणी घटली होती.

अनलॉकमध्ये परिस्थिती सुधारली : गेल्या वर्षी अनलॉकनंतर चौथी तिमाही म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हा सणासुदीचा काळ होता. यामुळे सोन्याची विक्री रूळावर आली. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद होता. तरी या काळातील २०१९ च्या तुलनेत सोन्याला ८ % कमीच मागणी होती. लॉकडाऊनमध्ये मर्यादित पाहुण्यांत विवाहांना परवानगी होती. याचा फायदा घेत मोठ्या संख्येने विवाह लागले. बाजारही खुले होते. यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान सोन्याच्या विक्रीत ३९ टक्क्यांनी वाढ झाली. या तीन महिन्यांतच १४० टन सोने विकले गेले. परंतू एप्रिल पासून लागलेल्या लॉकडाऊनने पुन्हा विक्री घसरली. सामान्य परिस्थितीत मे-जूनमध्ये विवाहाच्या काळात २०० टन सोन्याची विक्री होते. यंदा ती १००-११० टनाहून कमीच झाली, असे इंडिया बुलीयन अॅण्ड ज्वेलर्स असोेसिएशनचा अहवाल सांगतो.

ट्रेंड बदलतोय : खूप कलाकारी असणाऱ्या दागिन्यांची जागा साध्या दागिन्यांनी घेतली आहे. ते प्रत्यक्ष घालून पाहण्याची गरज भासत नसल्याने ऑनलाइनकडे कल वाढला आहे. पारंपरिक सराफा दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ब्रँडेड शोरूमला पसंती मिळत आहे. सोन्यातील गुंतवणूकही घटली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post