‘झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही’; अजित पवारांचा मोठा खुलासा


माय वेब टीम  

मुंबई | एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावरून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी झोटिंग कमिशनच्या अहवालाबद्दल खुलासा केला आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणी नेमलेल्या झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही. मग त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर ठपका आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. कमिशनच्या अहवालानुसार एकनाथ खडसे यांच्यावर ठपका असल्याचं पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.

अहवाल अद्याप आमच्यापर्यंत आला नाही. वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. अहवाल आल्यानंतर त्यामध्ये काय म्हटलंय, हे समोर येईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य आजही रेकॉर्डवर आहे, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना देखील निशाण्यावर घेतलं आहे.

दरम्यान, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बैठकीत नेते बोलत असतात. परंतु महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही एक आहोत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याशी आमची चर्चा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post