माय वेब टीम
पुणे | भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पुणे येथील शासकीय विश्रामगृहात हा पक्ष प्रवेश झाला.
पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवेशानंतर प्रशांत पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे, असं प्रशांत पाटील यांनी सांगितलं.
प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते. आगामी काळात नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका देखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.
Post a Comment