OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात : आता सत्तेवर आलात, भविष्यात..


माय वेब टीम 

पुणे - एवढं छोटा मन ठेवून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. या सरकारचा मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या. (BJP Pankaja Munde Attacked on thackeray Government Over OBC Reservation in Pune)

आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Political Reservation) भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. पुण्यात देखील भाजप नेत्यांनी आंदोलन करुन सरकारला जाब विचारला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”


मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते… ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले… याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या… ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो… आम्ही काही सर्व्हे करत होतो… आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता… तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे… इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही… सरकार फक्त गोल गोल फिरवतंय, असं म्हणत सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post