ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचे थैमान, सात दिवसात ३५ हजार बाधित

वेब टीम  

लंडन- वेगाने लसीकरण करून करोना निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या ब्रिटनला डेल्टा वेरिएंटने झटका दिला आहे. ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचे थैमान सुरू आहे. मागील सात दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये ३५ हजार करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत एक लाख ११ हजार १५७ जणांना करोनाची लागण झाली आहे. मागील एक आठवड्यात डेल्टा वेरिएंटबाधितांची संख्या ४६ टक्क्यांनी वाढली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएंटचा संसर्ग वेगाने होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, एकूण बाधितांपैकी ४२ जणांना डेल्टा प्लस या वेरिएंटची बाधा झाली आहे. काही भागांमध्ये याचा प्रसार होण्याची अधिक शक्यता आहे.

हॅरीस यांनी म्हटले की, लशीचे दोन डोस एका डोस एका डोसच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेणे आवश्यक असून दुसऱ्या डोसची वेळ न चुकवण्याचे आवाहन त्यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post