धक्कादायक!राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधनमाय वेब टीम 

मुंबई - विजय हा दुचाकीवरून आपल्या मित्राच्या घरून परत येत असताना वाटेत हा अपघात घडला. यावेळी अपघातानंतर विजयवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र तरीही विजयचे प्राण वाचू शकले नाहीत.

    राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित कन्नड अभिनेता संचारी विजय याचं निधन झालं आहे. त्याच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. शुक्रवारी विजयचा बंगळूरूमध्ये अपघात झाला होता. यात गंभीर जखम विजयला झाली. त्यावेळी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला.

    विजय हा दुचाकीवरून आपल्या मित्राच्या घरून परत येत असताना वाटेत हा अपघात घडला. यावेळी अपघातानंतर विजयवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र तरीही विजयचे प्राण वाचू शकले नाहीत.

    अभिनेता किच्चा सुदीपने ट्विटरद्वारे ही बातमी चाहत्यांना दिली. त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की,  ‘संचारी विजयने शेवटचा श्वास घेतला, या लॉकडाऊनमध्ये दोनदा त्यांची भेट घेतली होती…तो पुढील चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होता, जे झाले ते अतिशय खेदजनक आहे. त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवाराला सावरण्यास शक्ती मिळो…

    0/प्रतिक्रिया द्या

    Previous Post Next Post