जिममध्ये न जाता करा कार्डिओ वर्कआऊट; असा करा घरात व्यायाम


 माय वेब टीम

 हेल्थ डेस्क -  शरीर सुडौल आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो. पण, या प्रयत्नांना काही खास एक्ससाईजची  साथ मिळाली तर आणखीन फायदा होऊ शकतो.

स्वतःचं शरीर फिट दिसावं यासाठी प्रयत्न करणार्‍या महिलांनी अंतर्गत आरोग्याचाही विचार करायला हवा. आपले स्नायू मजबूत  असतील ब्लड सर्क्युलेशन  चांगलं असेल तर, आपण हेल्दी आयुष्य जगू शकतो. पण हेल्दी आयुष्य जगण्यासाठी वर्कआऊट करणं महत्त्वाचं आहे. वर्कआउट करण्यासाठी जिम करता वेळ काढू शकत नसाल तर हे साधे सोपे वरकाऊट घरच्या घरी देखील करता येतील.

या कार्डिओ वर्कआऊटमुळे तुमचं वजन नियंत्रणात येऊन शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकतो. प्रत्येक एक्ससाईज 40 सेकंद करावी आणि त्या 20 सेकंदाचा गॅप घ्यावा. याकरता केवळ 15 मिनिटांचा वेळ लागणार आहे. अगदी कमी वेळामध्ये एक्ससाईज होतात मात्र, याचा फायदा खूप जास्त मिळतो. यासंदर्भात हर जिंदगीमध्ये माहिती देण्यात आली आहे.

बायसिकल क्रंच

बायसिकल क्रंच करता योगा मॅटवर पाठीवर झोपा. शांत श्वासोच्छवासावर करा. पाय सरळ ठेवा. दोन्ही हात डोक्याखाली आणा. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यांमध्ये वाकून छातीजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि डावा हात त्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे दुसर्‍या पायाने देखील हीच क्रिया करा. यामुळे तुमच्या पोटाचे स्नायू आकुंचन पावतात. शिवाय पायाचे स्नायू ताणले जातात. लक्षात ठेवा हे करत असताना तुम्हाला तुमची पाठ जास्तीत जास्त सरळ ठेवण्याचा प्रयत्न करून खांदे विरुद्ध दिशेला वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

माऊंटन क्लाइंबर

या व्यायामासाठी योगा मॅटवर गुडघे टेकून बसा. आपले दोन्ही हात पुढच्या बाजूला ठेवा. दोन्ही हातांमध्ये योग्य अंतर ठेवा. हातावर वजन बॅलन्स करत आपले दोन्ही पाय मागच्या बाजूला न्या. सरळ रेषेत समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपली बोटं जमिनीवर टेकवा आणि हातांवर वजन ठेवून समांतर राहा. त्यानंतर एक पाय गुडघ्यामध्ये दुमडून छाती जवळ नेण्याचा प्रयत्न करा. तो पाय मागे नेल्यावर दुसरा पाय दुमडून छातीजवळ नेण्याचा प्रयत्न करा. अशाप्रकारे दोन्ही पायांनी 15 वेळा एक्सरसाईज करा. त्याचवेळी हाताने शरीर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा.

जंप स्कॉट्स

दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर ठेवून उभे रहा. दोन्ही हात समोर सरळ ठेवा. आता जंप स्कॉट्स करण्यासाठी पाय गुडघ्यामध्ये दुमडत कंबर मागे घेत खाली वाका त्यानंतर उडी मारून सरळ उभे रहा. अशाप्रकारे 15 वेळा एक्सरसाईज करा. लक्षात ठेवा दरवेळी सरळ रेषेमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे.

फॉरवर्ड लंज

पायात योग्य अंतर घेऊन सरळ उभं रहा. दोन्ही हात खांद्यांसमोर सरळ ठेवा. 1 पाय पुढे घेऊन गुडघ्यामध्ये वाकवा. दुसरा पाय मागच्या बाजूला नेऊन सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जो गुडघा पुढे घेतलेला आहे तोच हात त्या गुडघ्यावर ठेवा आणि 90 डिग्रीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. या काळात आपला मागचा पाय ताठ आणि सरळ राहिला पाहिजे. पुन्हा दुसर्‍या पायाने आणि हाताने हीच क्रिया करा. ही क्रिया देखील 15 वेळा करायची आहे.

स्ट्रेट लेग राईज

योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा. आता दोन्ही हात दुमडून कमरेखाली न्या. पाय एकमेकांना जोडून वर सरळ रेषेमध्ये उचलण्याचा प्रयत्न करा. पाय जास्तीत जास्त ताठ ठेवण्याचा प्रयत्न करत वर न्या. पाय कमरेपासून पूर्ण उचलायचे आहेत. या वेळी आपल्या पोटावरती जोर देण्याचा प्रयत्न करा. हळूहळू पाय पूर्वस्थितीत आणा.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post