महागाईत ‘पेट्रोल’चा भडका! मुंबई-पुण्यात प्रति लिटर १०२+, तर परभणीत १०५ रुपयांवर पोहोचले दर


 

माय वेब टीम

मुंबई -  बुधवारी देशामध्ये पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही अधिक झालीय. बुधवारी म्हणजेच १६ जून २०२१ रोजी इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ रुपये प्रति लिटरवरुन ९६.६६ वर पोहचले आहेत. तर दिल्लीतील डिझेलचे दर ८७.२८ रुपये प्रति लिटरवरुन ८७.४१ प्रति लिटरवर पोहचलेत. मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०२.८२ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९४.८४ रुपये मोजावे लागताय.

इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्या रोज इंधनाचे दर बदलत असतात. जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. वेगवेगळ्या राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात.

 

चार मेट्रो शहरांमधील इंधनाचे दर किती?

(माहिती – इंडियन ऑइलकडून साभार)

दिल्ली –
पेट्रोल – ९६.६६ रुपये प्रति लिटर
डिझेल – ८७.४१ रुपये प्रति लिटर

मुंबई –
पेट्रोल – १०२.८२ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९४.८४ रुपये प्रति लिटर

चेन्नई –
पेट्रोल – ९७.९१ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९२.०४ रुपये प्रति लिटर

कोलकाता –
पेट्रोल – ९६.५८ रुपये प्रति लिटर
डिझेल – ९०.२५ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील दर किती?

महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशिममध्ये एका लिटर पेट्रोलसाठी १०३ रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे.

मुंबईसोबतच अकोला, चंद्रपुर, धुळे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, ठाण्यात पेट्रोलचे दर १०२ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post