गेल्या 24 तासांत आढळले 46,498 नवीन प्रकरणे, 58,540 बरे तर 978 मृत्यू

\

 माय वेब टीम 

नवी दिल्ली  - देशात गेल्या 24 तासांत 46 हजार 498 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. दरम्यान, 58 हजार 540 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 978 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतांचा हा आकडा गेल्या 76 दिवसांत एक हजारांपेक्षा कमी आला आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी 880 लोकांचा कोरोनाने जीव घेतला होता.

उपचार घेणार्‍यांच्या आकडेवारीतही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी सक्र‍िय रुग्णांच्या संख्येत 13 हजार 34 ने घट झाली होती. देशात सध्या 5 लाख 68 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 46,498
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 58,540
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 978
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.02 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.93 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.96 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 5.68 लाख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post