सुंदर व नितळ त्वचेसाठी १५ मिनिटांसाठी नियमित करा हे काम, चेहऱ्यावरील थकवा होईल कमी माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क : ऑफिसचे काम, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे बहुतांश जणांच्या झोपेवर वाईट परिणाम होतात. यामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चेहरा (Skin Care Tips) निस्तेज दिसतो. तसंच सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने-प्रसन्नही वाटत नाही. झोप पूर्ण न झाल्यास आपल्या त्वचेवरही दुष्परिणाम दिसून येतात. यावर उपाय म्हणून आपल्या त्वचेसाठी नियमित सकाळी केवळ १५ मिनिटांचा वेळ काढावा. 

नितळ त्वचेसाठी आपल्या स्वयंपाकघरातील तीन नैसर्गिक सामग्रींचा उपयोग करावा. या तिन्ही सामग्री नीट मिक्स करून चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा. यातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. 

​त्वचेसाठी वापरा या ३ सामग्री

चेहरा प्रसन्न दिसावा, यासाठी आपल्या स्वयंपाकघरात सहजरित्या आढळणाऱ्या या सामग्रींचा वापर करून पाहा. यापूर्वी तज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला विसरू नका.

अर्धा चमचा मध

चार ते पाच थेंब दूध

चिमूटभर हळद

या तिन्ही गोष्टी एकत्र व्यवस्थित मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. या फेस पॅकमुळे आपल्या त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल.

पाण्याने चेहरा धुवायचा नसल्यास?

तुम्ही नाश्ता तयार करण्याच्या किंवा अन्य कामामध्ये व्यस्त असल्यास फेस मास्क काढण्यासाठी पाण्याचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही. यासाठी आपण कापूस अथवा कॉटनचा रूमाल घेऊन कोमट पाण्यात भिजवा आणि याने आपला चेहरा पुसून घ्या.

दोन ते तीन वेळा हे काम केल्यास त्वचेवर जमा झालेले धूळ-मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल आणि तुम्हाला थंडीच्या दिवसांत त्रास देखील होणार नाही. यानंतर आठवणीने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा.

​मानेवरही गुलाब पाणी लावा

हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळेस मानेपर्यंत फेस पॅक लावणे, याचा विचार देखील काही जण करणार नाहीत. म्हणूनच थंडीच्या दिवसांत केवळ चेहऱ्यावरच फेस पॅक लावा. पण गुलाबपाणी मात्र मानेवरही लावा. म्हणजे मान आणि चेहऱ्याच्या रंगामध्ये फरक दिसणार नाही. शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटेल.

चेहऱ्यावर मध लावल्यानंतर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या क्रीमचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही.

त्वचा कोरडी असल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॉइश्चराइझिंग क्रीमचा वापर करावा.

त्वचेसाठी हे फेस पॅक आहे प्रभावी

फेस पॅकमध्ये मध, हळद आणि दुधाचा समावेश असल्याने आपल्या त्वचेला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. हळदीमध्ये अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवरील सूज कमी होते.

मधातील नैसर्गिक मॉइश्चर आणि अँटी-ऑक्सिडंटमुळे त्वचेला ओलावा मिळतो. तर दुधामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचेला पोषण तत्त्वांचा खोलवर पुरवठा होतो आणि त्वचा निरोगी देखील राहते.

​गुलाब पाणी का लावावे?

पॅक धुतल्यानंतर त्वचेवर गुलाब पाणी लावणे विसरू नका. गुलाब पाण्यामुळे त्वचेवर आलेली नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत मिळते. गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी नॅचरल स्किन टोनरप्रमाणे कार्य करते.

फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात, ते बंद करण्याचे कार्य गुलाब पाणी करते. जेणेकरून बाहेरील दुर्गंध, धूळ-मातीचे कण त्वचेच्या आतमध्ये प्रवेश करणार नाहीत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post