लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला झटका; फ्रान्समधील फ्लॅटवर 'ईडी'ने केली अशी कारवाई

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली : कर्जबुडावा फरार उद्योजक विजय मल्ल्याची आर्थिक कोंडी सक्तवसुली संचनालयाकडून केली जात आहे. आज ईडीकडून फ्रान्समधील तपास यंत्रणांच्या माध्यमातून विजय मल्ल्याच्या आलिशान फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. या अपार्टमेंटची किंमत १६ लाख युरो (भारतीय चलनात १४ कोटी रुपये) आहे. मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्सच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात प्रदेशात निधी वळवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मनी लाॅडरिंग संदर्भात मलल्याचा तपास केला जात आहे. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.

आजच्या कारवाईबाबत ईडीकडून जरी करण्यात आलेल्या निवेदनात विजय मल्ल्या याची 32 Avenue FOCH ही फ्रान्समधील मालमत्ता जप्त करण्यात आली. या अपार्टमेंटची किंमत सुमारे १४ कोटी आहे. ईडीकडून २५ जानेवारी २०१६ रोजी किंगफिशर एअरलाईन्स, विजय मल्ल्या आणि इतर जणांविरोधात मनी लाॅडरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणी ईडीकडून ११२३१ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ५ जानेवारी २०१९ रोजी विशेष न्यायालयाने विजय मल्ल्या याला फरार घोषित केले होते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post