कर्ज देणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला 'तारक मेहता..'चा लेखक, राहत्या घरात केली आत्महत्या

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई- जर तुम्हाला फोन, एसएमएस किंवा ईमेलवर कर्ज देण्याबद्दल कोणी सांगितलं तर त्या जाळ्यात अडकू नका. जर एखाद्याने अशा आर्थिक व्यवहारासाठी दबाव निर्माण केला तर लक्षात घ्या तुमच्याविरोधात फसवणूकीचा सापळा रचला जाऊ शकतो. जर तुम्ही अशा जाळ्यात अडकले असाल तर वेळीच पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती द्या. कारण 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेच्या लेखकांपैकी एक अभिषेक मकवाना याचा जीव अशाच एका जाळ्यात अडकून गेला.

अभिषेक मकवानाच्या कथित आत्महत्या प्रकरणात एक नवीन बाब समोर आली आहे. अभिषेकने सुसाईड नोटमध्ये आर्थिक समस्येसी लढा देत असल्याचा उल्लेख केला होता. पण आता ही बातमी समोर आली आहे की अभिषेक काही फसव्या कर्ज देणार्‍या कंपन्यांच्या तावडीत सापडला होता. त्या कंपन्या त्याच्यावर पैसे भरण्यासाठी सतत दबाव टाकत होते. याच कारणामुळे अभिषेकने आत्महत्या केली.

अभिषेक मकवानाचा भाऊ जेनिसने खुलासा केला की अभिषेक काही आर्थिक संकटात सापडला होता. जेनिसने अभिषेकचे ईमेल पाहिले असता त्याने एका अ‍ॅपकडून कर्ज घेतल्याचं समोर आलं. जेनिसच्या म्हणण्यानुसार, अभिषेकच्या निधनानंतर बर्‍याच जणांचे फोन आले आणि जनिस यांना थकित पैसे भरण्यास सांगितलं. असं करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जेनिससोबत असभ्य भाषेत बोलायला सुरुवात केली. 

शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी पोलिसांना कांदिवली येथील राहत्या घरात अभिषेकचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोटही मिळाली. याच अभिषेकने तो आर्थिक समस्यांमध्ये असल्याचं त्याने लिहिलं होतं. यानंतर पोलिसांनी अभिषेकच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवून घेतला. जेनिस म्हणाला की, अभिषेकच्या मृत्यूवेळी तो अहमदाबादमध्ये होता. या संपूर्ण घटनेबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा कर्जाशी संबंधित पैशांची भरपाई करण्यासाठी त्याला फोन येऊ लागले तेव्हा त्याला संपूर्ण प्रकरण कळलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post