? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा...

 


माय अहमदनगर वेब टीम

शनिवार, ०५ डिसेंबर २०२०. चंद्र आपले स्वामित्व असलेल्या कर्क राशीत विराजमान असेल. चंद्रावर शनी आणि गुरु ग्रहाची थेट दृष्टी राहील. आजच्या ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे सिंह राशींना दिवस उत्तम असेल. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... 

आजचे मराठी पंचांग : शनिवार, ०५ डिसेंबर २०२०

मेष : घरातील कामात मदत कराल. समोरच्या व्यक्तीकडून प्रशंसा होईल. कार्यक्षेत्रात परिवर्तन करण्याचा विचार असल्यास काळ अनुकूल नाही. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. नवीन प्रकल्पात यश मिळू शकेल. अधिकारी वर्ग व सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभ : कामे पुढे सरकतील. प्रकृतीला जपा. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला, ही उक्ती लक्षात ठेवून कार्यरत राहावी. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. व्यापारी वर्गाला प्रवासातून लाभ मिळू शकतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. 


मिथुन : नवीन संधी शोधून काढाल. पैसे खर्च करताना विचार करा. काही समस्या उद्भवू शकतात. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहावे. कौटुंबिक वातावरण शांततामय आणि सौहार्दपूर्ण असेल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा, विचार-विनिमय करणे हिताचे ठरेल. 


पहिल्या महिला सैन्यतुकडी निर्माता महोत्कट गणपती; वाचा, रंजक कथा 


कर्क : घराच्या सुशोभीकरणासाठी आपला वेळ खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. सामाजिक कार्यामुळे ख्याती वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहिल्यास अनेक उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. गुंतवणूक लाभप्रद ठरू शकेल. व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकेल. सकारात्मकता संचारेल. 


सिंह : मोठ्या व्यक्तींची घरात काळजी घ्या. लांबच्या प्रवासाचे आराखडे तयार कराल. कार्यक्षेत्रातील प्रयत्न यशकारक ठरू शकतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मन प्रसन्न राहील. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. जोडीदाराच्या भावनांचा, मतांचा आदर करावा. 


कन्या : अडकलेले निकाल आपल्या बाजूने लागतील. विद्यार्थ्यांना नव्या उमेदीचा काळ. स्वतःसाठी वेळ द्यावा. कार्यक्षेत्रातील वातावरण आपल्यासाठी अनुकूल असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. व्यवसायातील निर्णयाचे सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. 


'हे' मसाले ठरतील भाग्योदयकारक; वाचा, ज्योतिषीय फायदे व महत्त्व 


तुळ : व्यवसायात मोठी हालचाल दिसून येईल. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात दुसऱ्यांवर विश्वास ठेवणे महागात पडू शकेल. स्वतःच्या अटींवर कामे पार पाडावीत. विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. कुटुंबातील समस्यांना धैर्य, संयमाने सामोरे जावे. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी नाही. जबाबदारी वाढेल. 


वृश्चिक : स्वकर्तृत्वावर लढाई जिंकाल. आपल्या मताशी पक्के राहा. रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. वडिलांच्या शुभाशिर्वादामुळे उज्ज्वल भविष्याचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. नवीन मित्र होतील. मिळकतीच्या नव्या स्रोतांची माहिती मिळू शकेल. कौटुंबिक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. कार्यक्षेत्रातील अधिकारी वर्गाचा पाठिंबा लाभेल. 

धनु : काही गोष्टी करण्याबाबत विचार पक्का होत नसेल तर थोडे थांबा. टोकाचा निर्णय घेऊ नका. अनेक दिवसांनंतर चांगली बातमी मिळू शकेल. लाभाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. कामाचा ताण वाढेल. मात्र, हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. जोडीदाराचे सहकार्य मोलाचे ठरेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. 

मकर : समोरच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. प्रिय व्यक्तींकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकेल. मुलांसंदर्भातील समस्यांचे निराकरण होऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकेल. वडिलांशी मतभेद संभवतात. 

कुंभ : नव्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक कामे हातून घडतील. आजचा दिवस संमिश्र असेल. कार्यक्षेत्रात आपण घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतील. मेहनत आणि ज्ञानाच्या जोरावर समस्यांचे निराकरण होऊ शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना वाढीव मेहनत घ्यावी लागेल. 

मीन : स्वतःवर ताबा मिळवण्यात यश येईल. मुलांबरोबर उत्तम वेळ घालवाल. पालकांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. भविष्याबाबत एखादा ठोस निर्णय शक्य. विवाहेच्छुकांसाठी नवीन स्थळे येऊ शकतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मित्रांच्या मदतीमुळे लाभ मिळू शकेल. व्यापाऱ्यांची गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती सुधारेल

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post