माय अहमदनगर वेब टीम
अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचे महत्त्व प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. अश्वगंधामुळे मिळणाऱ्या असंख्य आरोग्यदायी फायद्यांमुळे या औषधी वनस्पतीचा शतकानुशतके वापर केला जात आहे. लैंगिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये या औषधी वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, हे लोकांना माहिती आहे. याव्यतिरिक्त अश्वगंधाचे अन्य आरोग्यदायी लाभ देखील आहेत.
अर्थात अश्वगंध ही एक औषधी वनस्पती आहे. पण याचे योग्य प्रमाणातच सेवन करणं देखील आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अश्वगंधामध्ये अँटी- ऑक्सिडंट, अँटी इंफ्लेमेटरी, अँटी स्ट्रेस, अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यातील औषधी घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि चांगली झोप मिळण्यास मदत मिळते. शिवाय मेंदूची कार्यप्रणाली देखील सुरळीत सुरू राहते.
त्वचा राहते तरूण
शारीरिक आणि मानसिक तणावामुळे आपल्या त्वचेवरही दुष्परिणाम होतात. ही समस्या नियंत्रणात आणण्यासाठी बहुतांश जण ब्युटी प्रोडक्टवर अवलंबून असतात. पण यामुळे दीर्घकाळासाठी लाभ मिळत नाहीत.
अश्वगंधाचे नियमित सेवन केल्यास त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते. अश्वगंधामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती जलदगतीने होते. कोलेजनमुळे त्वचेवरील सुरकुत्या, मुरुम, संसर्ग आणि रॅशेज कमी होण्यास मदत होते. शिवाय त्वचेच्या पेशींना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि त्वचा चमकदार देखील होते
केसगळतीची समस्या कमी होते
हल्ली लहान मुलांना देखील केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
साधारणतः वय वर्षे ३०च्या आसपास असणारे बहुतांश जण पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अश्वगंधेचं नियमित सेवन केल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
अश्वगंधा शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. शरीरामध्ये या हार्मोनची पातळी वाढल्यास केसगळती मोठ्या प्रमाणात होते.
मेलेनिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. अश्वगंधामधील अमिनो अॅसिडमुळे मेलेनिनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते, ज्यामुळे केस नैसर्गिक स्वरुपात काळे देखील राहतात.
लैंगिक जीवन सुधारते
अश्वगंधाच्या सेवनामुळे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत मिळते. या औषधी वनस्पतीचे सेवन केल्यास जननेंद्रियाशी संबंधित आजार देखील दूर होण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ महिलांमधील व्हाइट डिस्चार्ज (पांढरे पाणी जाणे) आणि पुरुषांमधील इरेक्शनची समस्याही दूर होते.
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी लाभदायक
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही औषधी वनस्पती फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात अश्वगंधाचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राहते. यातील पोषक घटकांमुळे शरीराच्या स्नायूंनाही भरपूर लाभ मिळतात
पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर
अश्वगंधाचं नियमित सेवन केल्यास चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. या औषधी वनस्पतीमध्ये अँटी - ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या शरीराचे हानिकारक फ्री रॅडिकल्सच्या समस्येपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात. तसंच पचनसंस्थेचं झालेलं नुकसान सुद्धा भरून काढतात.
रक्तशर्करा नियंत्रणात राहते
मधुमेहानं ग्रस्त असलेल्या रुग्णांनी नियमित अश्वगंधाचं सेवन करणं अधिक लाभदायक ठरते. कारण यातील औषधी तत्त्व आपल्या रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात.
NOTE आरोग्याशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Post a Comment