राज्यात फटाक्यांवर बंदी आणा - सत्यजीत तांबे

 




माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदी घातली यानंतर अशी बंदी महाराष्ट्रातही घालण्याची मागणी युवा काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडून करण्यात आली आहे. पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तांबे यांनी मागणी केली आहे. यामुळे सध्या काही घटकांचे नुकसान होईल तरीही पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणायला हवी असे सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनाचा काळ असला तरीही बाजार सजले आहेत. नागरिकांची खरेदीची लगबग सुरू आहे. दरम्यान यावर्षी फटाक्यांवर बंदी आणावी अशा चर्चा सुरू आहेत. प्रत्येकवर्षी याविषयी चर्चा केली जात असते. मात्र यंदा या चर्चेने जोर धरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही फटाक्यांचा वापर मर्यादित करावा, असे आवाहन राज्यातील जनतेला केले होते. आता त्यानंतर आता काँग्रेसने फटाके बंदीचीच मागणी केली आहे.

सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे ही मागणी केली. ते म्हणाले की, 'दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकाराने फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटक्यांवर कायमची बंदी आणवी. या व्यावसायात मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग अवलंबून आहे. तरीही पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून आता थोडे नुकसान झाले तरी चालेल. मात्र, येणाऱ्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे' असे तांबे म्हणाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post