किती मिनिटे करावा मॉर्निंग वॉक? नियमित व्यायाम केल्यास आरोग्याला मिळतील हे लाभ

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क - मॉर्निंग वॉक केवळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो, असा काही जणांचा समज आहे. वास्तविक असे मुळीच नव्हे. नियमित मॉर्निंग वॉक केल्यास वजन नियंत्रणात राहण्याव्यतिरिक्त आरोग्याला अन्य कित्येक लाभ मिळतात.

शारीरिक ऊर्जा वाढते

तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटत असल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी मॉर्निंग वॉक करण्यास सुरुवात करा.

कारण नियमित मॉर्निंग वॉक करणारे लोक शारीरिकदृष्ट्या अधिक अ‍ॅक्टिव्ह असल्याचे आढळते. दिवसाच्या सुरुवातीस २० ते ३० मिनिटांसाठी वॉक केल्यास आपल्याला दिवसभरातील काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे जी लोक नियमित मॉर्निंग वॉक करतात त्यांच्या शरीरात रात्रीपर्यंत ऊर्जा टिकून राहते.

शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिऊन करण्याऐवजी आपण १० मिनिटांसाठी पायऱ्या चढण्याचे तसंच उतण्याचे काम करू शकता. या व्यायामामुळे आपल्याला कॉफीपेक्षाही अधिक ऊर्जा मिळेल.

तसंच शरीरातील रक्तप्रवाह देखील वाढतो. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहिल्याने शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत मिळते. यामुळे तुम्हाला अधिक उत्साह आणि प्रसन्नता जाणवते. हा व्यायाम करण्यापूर्वी आपण कोमट पाणी पिऊ शकता.

मानसिक विकारांपासून होतं संरक्षन

आठवड्यात पाच दिवस मॉर्निंग वॉक केल्यास कित्येक प्रकारच्या मानसिक विकारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. कारण मॉर्निंग वॉकमुळे शरीरामध्ये एस्ट्रोजेन आणि डोपामाइन या हार्मोनची पातळी वाढते. सोबतच मानसिक ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळीही घटू लागते. कॉर्टिसोल हार्मोनमुळे मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य यासारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते.

​स्नायू होतात मजबूत

मॉर्निंग वॉक केल्याने शरीराचे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. यामुळे आपल्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. शारीरिक थकवा जाणवत नाही. सकाळच्या वेळेस वातावरणात ऑक्सिजनची पातळी अधिक आणि दिवसभराच्या तुलनेत हवा अधिक स्वच्छ असते

मॉर्निंग वॉक केल्यानं शरीराला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे श्वसनाशी संबंधिक विकार दूर राहण्यास मदत मिळते. तसंच पायांच्या स्नायूंचा देखील व्यायाम होतो. कठीण व्यायाम प्रकार करण्याऐवजी नियमित काही मिनिटांसाठी मॉर्निंग वॉक करावा. यामुळे तुम्हाला भरपूर आरोग्यदायी लाभ मिळतील.

​गाढ झोप लागते

मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना रात्रीची चांगली आणि गाढ झोप येते. या लोकांना रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येत नाही. झोप पूर्ण झाल्याने सकाळी उठल्यानंतर त्यांचा मूड प्रसन्न असतो. शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप मिळणं आवश्यक आहे.

​दोन आठवड्यांतच दिसेल फरक

कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केल्यानंतर थोड्या प्रमाणात समस्या निर्माण होतातच. पण शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी मॉर्निंग वॉक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. सलग दोन आठवडे मॉर्निंग वॉक केल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये भरपूर चांगले बदल जाणवतील. यानंतर तुम्ही मॉर्निंग वॉक करणं कधीही टाळणार नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post