भारताचे क्रिकेटपटू आता होणार मालामाल, किती कोटी रुपये मिळणार पाहा...

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली : भारताचे क्रिकेटपटू आता मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. कारण बीसीसीआय आता आपल्या काही नियमांमध्ये बदल करणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना आता चांगलाच आर्थिक फायदा होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

बीसीसीआय आपल्या सेंट्रल करारामध्ये काही महत्वाचे बदल करणार आहे. त्यामुळे जे खेळाडू या करारापासून वंचित राहिले होते, त्यांनाही आता या करारामध्ये सामील करण्यात येऊ शकते. आता ट्वेन्टी-२० खेळाडूंनाही बीसीसीआय आपल्या करारामध्ये सामील करण्यात असल्याचे समजत आहे. पण यासाठी बीसीसीआय एक अट ठेवणार आहे. जे खेळाडू भारताकडून किमान १० ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यांना या करारामध्ये सामील करण्यात येणार आहे. त्यामुळे जे खेळाडू या करारात सामील होतील, त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडेल, असे म्हटले जात आहे.

बीसीसीआयच्या करारामध्ये श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणी आहेत. ए प्लस श्रेणीमधील क्रिकेटपटूंना बीसीसीआय सात कोटी रुपये देते. या श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. ए श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय पाच कोटी रुपये देते, यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन आणि रिषभ पंत या खेळाडूंचा समावेश आहे. सी श्रेणीतील क्रिकेटपटूंना बीसीसीआय तीन कोटी रुपये देते, यामध्ये वृद्धिमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सी श्रेणीतील क्रिकेटपटूंना बीसीसीआय एक कोटी रुपये देते, यामध्ये केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंगटन सुंदर या खेळाडूंचा समावेश आहे.

यापूर्वी बीसीसीआय कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच आपल्या करारामध्ये सहभागी करत होती. ज्या खेळाडूने सात एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळले आहेत त्यांना यापूर्वी करारामध्ये सामील करून घेतले जायचे. फक्त ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना करारामध्ये सामील करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले होते. पण आता यामध्ये काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त ट्वेन्टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंनाही बीसीसीआय आपल्या करारामध्ये सामील करून घे शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post