'एसबीआय'ला बंपर नफा ; करोना काळात केली मोठी कमाई!


 माय अहमदनगर वेब टीम

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ४५७४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. विशेष म्हणजे कोव्हीड आणि टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन देखील बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ३०११ कोटींचा नफा झाला होता. यंदा त्यात वाढ झाली. त्याशिवाय बॅंकेचे निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण १.५९ टक्के इतके खाली आले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण २.७९ टक्के होते. तर ढोबळ बुडीत कर्जाचे प्रमाण ५.२८ टक्के होते. ते गेल्या वर्षी ७.१९ टक्के होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार बँकांना ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत बुडीत कर्जे म्हणून वर्ग केलेली नाहीत त्यांना पुढील आदेशापर्यंत जैसे थेच ठेवावे, असे म्हटलं आहे. 

सोने झाले स्वस्त ; कमाॅडिटी बाजारात जोरदार नफा वसुली

दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात १५ टक्के वाढ झाली आहे. व्याजातून बँकेला २८१८१ कोटींचे उत्पन्न मिळाले. जुलै ते सप्टेंबर या काळात बँकेच्या ठेवींमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली आहे. बँकेला याच काळात ७५३४१.८० कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचाऱ्यांच्या सुधारीत वेतनासाठी २१२४ कोटींची तरतूद करण्यात आली. तर कोव्हीडशी संबंधित खात्यासाठी २३९ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे बँकेने म्हटलं आहे. 

ई.एस.जी क्षेत्रात गुंतवणूक संधी; मिरे एसेटच्या दोन ईटीएफ योजना

बँक खात्यांतील व्यवहारांवर बँकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची ओरड होत असतानाच जनधन खात्यांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, हे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केल्यानंतर आता कोणतीही सरकारी बँक बँक खात्यांवर सेवाशुल्क आकारणार नाही, असे मंगळवारी स्पष्ट केले आहे. सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने दरमहिना काही रोकड भरणा तसेच रोकड काढणे व्यवहार निःशुल्क केल्यानंतर त्यापुढील प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क आकारणी करण्याचे ठरवले होते. मात्र सरकारच्या घोषणेनंतर बँकेने हा आदेश मागे घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post