अहमदाबादमध्ये कापड्यांच्या गोदामात स्फोट, ९ जणांचा मृत्यू

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये बुधवारी कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीनंतर इमारतीत स्फोट झाल्यामुळे छप्पर कोसळले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी दाखल झाली आहे.

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व बचाव कार्य प्रगतीपथावर आहे. नानुकाका इस्टेट येथील कपड्यांच्या गोदामात ही आग लागली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनेत ९ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post