US Presidential Election निकाल लांबणार? जॉर्जियात फेरमतमोजणी होणार

माय अहमदनगर वेब टीम

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयासमीप ते पोहचले आहेत. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी मतमोजणीत गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. जाणून घेऊयात अमेरिकेच्या निवडणूक निकालाचे लाइव्ह अपडेट्स:

अमेरिकेत सत्तांतर होणार

>>> लाइव्ह अपडेट्स:

>> पाहा: अमेरिकेतील राज्यनिहाय निकालाचे लाइव्ह अपडेट्स

>> जॉर्जियामध्ये ट्रम्प यांना २४ लाख ४८ हजार ५७० मते, तर बायडन यांना २४ लाख, ५० हजार, १५४ मते

>> जॉर्जियात फेरमतमोजणी होणार; जॉर्जिया राज्याच्या सचिवांची माहिती

>> एरिजोनामध्ये डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार मार्क कॅली यांचा सिनेटरपदी विजय

>> पेन्सिलवेनियामध्ये २० इलेक्टोरल मते आणि जॉर्जियात १६ इलेक्टोरल मते

>> पेन्सिलवेनिया आणि जॉर्जियात जो बायडन आघाडीवर; ट्रम्प पराभवाच्या छायेत 

>> जॉर्जियात बायडन यांची ११०० मतांची निर्णायक आघाडी

>> फिलाडेल्फियामध्ये शस्त्रासह एका व्यक्तिला अटक; मतमोजणी केंद्रात घुसखोरी करण्याचा करत होता प्रयत्न

>> पेन्सिलवेनियात ट्रम्प यांना १८ हजार २२९ मतांची आघाडी

>> जॉर्जियात बायडन यांना ९१७ मतांची आघाडी, तर, नेवादामध्ये ११ हजार ४३८ मतांची आघाडी

>> जॉर्जियात ९९ टक्के मतमोजणी पूर्ण; बायडन यांची निर्णायक आघाडी

>> वाचा: ट्रम्प यांच्याकडून फेक न्यूजचा भडिमार; वृत्तवाहिन्यांनी बंद केले लाइव्ह भाषण

>> वाचा सविस्तर: US Election: पुन्हा मतमोजणी झाल्यास ट्रम्प यांचा विजय?

>> काही राज्यांमध्ये मतमोजणीत बायडन यांची मते वाढली; ट्रम्प यांच्याकडून बोगस मतदानाचा दावा

>> वाचा सविस्तर: 'या' पाच कारणांमुळे ट्रम्प यांना बसला झटका?

>> वाचा: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत १२० वर्षांतील 'या' विक्रमाची नोंद!

>> जॉर्जियात ट्रम्प आणि बायडन यांच्यात चुरशीची लढत; बायडन यांना ४९.१५ टक्के मते तर ट्रम्प यांना ४९.६२ टक्के मतदान

>> निकालापूर्वीच बायडन यांचा विक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळावणारे उमेदवार, ओबामा यांचा विक्रम मोडला

>> वाचा सविस्तर:ट्रम्प यांची कोर्टात धाव; तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप >> बायडन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदापासून फक्त एक पाऊल दूर

>> सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनुसार ट्रम्प चार राज्यांमध्ये आघाडीवर 

>> ट्रम्प काय म्हणतात, याची चिंता नाही. मात्र, प्रत्येक मतांची मोजणी झाली पाहिजे; डेमोक्रॅटीक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांची मागणी

>> अमेरिकेत सत्तांतर होणार? बायडन यांची निर्णायक आघाडी

>> बायडन यांचा ट्रम्प यांना आणखी एक धक्का; मिशिगनमध्येही मिळवला विजय

>> बायडन यांचा एरिजोनामध्ये विजय; ११ इलेक्टोरल मते मिळाली

>> विस्कॉन्सिनमध्ये आघाडीनंतर बायडन यांचा विजय; १० इलेक्टोरल मतांची भर

>> अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार व्हाईट हाउसच्या जवळ, बायडन यांचा विस्कॉन्सिस आणि मिशिगनमध्ये विजय

>> विस्कॉन्सिनमध्ये बायडन यांच्या विजयाने डोनाल्ड ट्रम्प असमाधानी. विस्कॉन्सिनच्या अनेक भागांतील मतमोजणीत गडबड झाल्याचं वृत्त आहे. यामुळे निकालावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पुन्हा मतमोजणी करण्याची ट्रम्प यांची मागणी

>> प्रत्येक ठिकाणी बायडन यांना मते मिळत आहेत. पेन्सिलवेनिया, विस्कॉन्सिन आणि मिशिगन येथे त्यांना मते मिळत आहेत. हे देशासाठी खूप वाईट घडतंयः डोनाल्ड ट्रम्प 

>> मतमोजणीवर शंका घेणारे ट्रम्प यांचे ट्विट- कालपर्यंत महत्त्वाच्या राज्यांमध्ये आपण आघाडीवर होतो. पण बॅलेट मोजणीने ही आघाडी हळूहळू धक्कादयकपणे कमी होत गेली. मतदान सर्वेक्षक हे चुकीचं असल्याचं मानत आहेत.

>> मेल बॅलेटची मोजणी कशी होतेय, हे मेल बॅलेट मोठ्या संख्येत आणि त्यांची क्षमता विद्ध्वंसक आहेः ट्रम्प

>> आता ट्रम्प पिछाडीवर, बायडन यांची मोठी आघाडी. ५३८ पैकी बायडन २३८ तर ट्रम्प २१३ वर 

>> मतमोजणीत सध्या तरी ट्रम्प आघाडीवर, बायडन यांची पिछाडी

>> जॉर्जिया मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, पेनिस्लेवेनिया, विस्कॉन्सिन या राज्यांमधील निकाल येणं बाकी

>> डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची घोषणा केलीय, तर बायडन यांच्या प्रचार व्यवस्थापकाने हे वक्तव्य प्रक्षोभक, अभूतपूर्व आणि चुकीचे असल्याचं म्हटलंय. बायडन कुठल्याही लढाईसाठी तयार 

> बायडन विरुद्ध ट्रम्प सामना सुप्रीम कोर्टात? ट्रम्प यांनी मतमोजणीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बायडन यांच्या कायदेशीर टीमने कोर्टातील ल

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post