अशक्तपणा येतोय? मग आहारात करा फणसाचा समावेश

माय अहमदनगर वेब टीम

फणस हे एकमेव असं फळ आहे जे अबाल-वृद्धांपासून साऱ्यांनाच आवडतं. बाहेरुन कितीही काटे असले तरी आत रसाळ गोड गरे असतात. त्यामुळे फणस हा अनेकांच्या आवडीचा असतो. साधारणपणे फणस गोड लागतो किंवा त्यांची एक खास चव असते त्यामुळे तो खाल्ला जातो. परंतु, फणस खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. त्यामुळे फणसपोळी, फणसाचा गर, सरबत या सारख्या विविध पदार्थांमधून गृहिणी आपल्या कुटुंबाला फणस खायला देतात. त्यामुळे फणस खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात

फणस खाण्याचे फायदे

१. फणसामुळे शरीराची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.

२. अशक्तपणा, जुना ताप दूर होतो

३. अतिसार होत असल्यास उपयोगी

४. शारीरिक ताकद वाढते.

५. सांधेदुखी असल्यास फणसाची कोवळी पानं गरम करुन त्याचा सांध्यावर शेक द्यावा.

६. शरीरावर मोठे फोड किंवा बेंड झाल्यास त्यावर फणसाचा चीक लावावा. त्यामुळे सूज कमी होऊन पू बाहेर पडतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post