जाणून घ्या, पेरु नेमका कधी खावा ; हे आहेत फायदेमाय अहमदनगर वेब टीम

पेरु हे फळ साधारणपणे साऱ्यांनाच आवडतं. अनेकदा शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या चिंचाबोरांच्या गाड्यांवर पेरु हमखास असतात. पूर्वी १ किंवा २ रुपयांना पेरु सहज मिळायचे. मात्र, आता त्याच एका पेरुसाठी १० किंवा १५ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक जण पेरु किंवा अन्य फळे घेण्याचं टाळतात. मात्र, पेरु खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पेरूचा आहारात कायम समावेश करावा.

१. आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

२. भूक वाढते.

३.शरीराची दाह कमी होते.

४.शौचास साफ होते.

५. हिरड्यांना सूज,दातदुखी होत असल्यास पेरूचं पान चावावे किंवा पानांचा रस दुखऱ्या भागावर लावावा.

६.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

७. शरीरावर सूज येऊन तो भाग ठणकत असल्यास पेरुच्या पानांचं पोटीस बांधावे.

‘या’ काळात पेरु खाऊ नये

१. सर्दी-खोकला असल्यास पेरू खाऊ नये.

२. पहाटे किंवा रात्री पेरु खाऊ नये.

३. फ्रीजमधील गार पेरु खाऊ नये.

४. कच्चा पेरू खाल्ल्यास पोटदुखी होते. त्यामुळे पिकलेलाच पेरु खावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post