सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा नवे दर
माय अहमदनगर वेब टीम
जागतिक बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही पाहायला मिळाला. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी सोन्याच्या दरात १ हजार ४९ रूपयांची घसरण होऊन दर ४८ हजार ५६९ रूपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे रूपयाचं मूल्य वधारल्याचा परिणामही यावर दिसून आला. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही १ हजार ५८८ रूपयांची घसरण झाली असून चांदीचे दरही ५९ हजार ३०१ रूपयांवर पोहोचले आहेत.
यापूर्वी कामकाजाच्या सत्रात सोन्याचे दर ४९ हजार ६१८ रूपये प्रति १० ग्राम आणि चांदीचे दर ६० हजार ८९९ रूपये प्रति किलो इतके होते. सध्या लग्न-समारंभाचा काळही सुरू होणार असून सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घरणीमुळे खरेदीदारही आकर्षित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रूपयाचं मूल्य वधारलं
“करोना विषाणूवरील लस आणि अमेरिकेत बायडेन यांच्याकडे सत्तेच हस्तांतरण होत असल्यानं सोन्याच्या किंमतीत सुरूवातीपासून घसरण पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम देशातील सराफा बाजारावर दिसून आला आहे. तर रूपयाचं मूल्यदेखील वधारल्याचा परिणाम किंमतीवर दिसून आला आहे,” असं मत एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनालिसिस्ट (कमोडिटी) तपन सेन यांनी सांगितलं.
अर्थव्यवस्था मजबूत होण्याची शक्यता
“करोनाच्या लसीच्या सकारात्मक बातमीमुळे अर्थव्यवस्थाही मजबूत होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार सोन्या-चांदीवरून बाजाराकडे वळले आहेत. जोखीम पत्करण्याची क्षमता आता वाढली आहे असं गुंतवणूकदार गृहित धरत आहेत,” असं मोतीलाल ओस्वाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post