गुळ व चणे खाण्याचे हे गुणकारी फायदे माहित आहेत का ? तर जाणून घ्या



माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - निरोगी आरोग्य सगळ्यांनाच हवंहवं असं असतं. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात तरुणाईसकट प्रत्येक वयोगटातील व्यक्ती फास्टफूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे सतत तळलेलं तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊन त्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. परिणामी, त्यातून अनेक शारीरिक तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपला आहारदेखील तितकाच सकस आणि पौष्टिक असला पाहिजे. 

१ मन: स्थिती सुधारते –

गुळ आणि चणे यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ चं पुरेपूर प्रमाण असतं. या दोन्ही घटकांमुळे स्मरणशक्ती बळकट होते. तसंच मेंदूची कार्य करण्याची क्षमतादेखील वाढते. तसंच मूड नियंत्रित करणारे हार्मोन्स सेरोटोनिन आणि नॉरपेनाफ्रिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण कमी होतो. परिणामी, मूड खराब असल्यास गुळ -चणे खावेत.

१.गुळ-चणे खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते.

२. ज्यांच्या शरिरात लोह आणि प्रथिनांची कमतरता, रक्ताची कमतरता आहे त्यांनी गुळ-चणे खावे.

३. मासिक पाळीदरम्यान गुळ-चणे खावे.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

६. अकाली दात पडण्याची समस्या दूर होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post